Ad will apear here
Next
यात्रा
मध्यवर्गीय आयुष्यातील भावभावना नातेसंबंध, नाट्य यांचे चित्रण सुमती भिडे यांच्या या कथासंग्रहातून होते. या संग्रहात एकूण २० कथा आहेत. संग्रहातील पहिल्याच ‘यात्रा’ या कथेत जन्मापासून अंतिम काळापर्यंत मनुष्य यात्रेकरूच असतो, ही संकल्पना या कथेचा आत्मा आहे. ‘नकुशी’ या कथेत अनाथ आश्रमातील दत्तक मुलगी आणि रक्ताचे नाते नसलेली तिची आई यांचे नाते समोर येते. ‘मळभ’, ‘डाग’ आणि ‘पुनर्जन्म’ या कथांमध्ये उच्चशिक्षित, कमावत्या स्त्रीचे वास्तव दाखविले आहे.

‘आश्रित’ या कथेत ग्रामीण वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागातील नागरिक अद्याप शिक्षणापासून वंचित आहेत, हे सामाजिक सत्य त्यांनी कथेतून मांडले आहे. ‘विश्वामित्र’ ही कथा आर्याच्या विजीगिषु वृत्तीच्या सत्यावर आधारित आहे. ‘स्वप्ना’ या कथेत स्वप्नातून वास्तवात आलेल्या स्वप्नाची ओळख होते.

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन
पाने : २२०
किंमत : ३२० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZSMBQ
Similar Posts
म्हातारा आणि बैल ग्रामीण भावविश्वावर आधारलेली ही कादंबरी माणूस आणि प्राणी यांचे परस्परसंबंध उलगडते. सुहास दामोदर मनसुटे यांनी एका म्हाताऱ्या शेतकऱ्याची आणि त्याच्या बैलाची सांगितलेली ही कथा आहे. शेतकरी जगताची ही कथा आहे. शेतकरी जगताची ही प्रातिनिधिक कथा आहे.
गार्बेज संजीवनी गोखले लिखित लघुकादंबरी, कथा, ललित लेख, आणि कविता यांचा समावेश असलेले हे पुस्तक. सुमित्रा ही कादंबरीची नायिका आहे. कोकणातील वेंगुर्ल्यापासून सुरू झालेला तिचा प्रवास अमेरिकेतील सिनसिनाटीमार्गे पुन्हा मुंबईत येऊन थांबतो.
पंचामृत कविता, कथा, लेख आणि अनुभवपर लेखनाचा समावेश असलेले हे पुस्तक. नीलकमल यांनी वेळोवेळी केलेले हे लेखन आहे. मनातले वादळ संगीताच्या साथीने शमते, तेव्हा शब्द ओठी येतात, ‘माझ्या मनाचे आकाश, निरभ्र निळेभोर, तेजाळे प्रकाश, अनाहत चंद्रकोर.’
नर्मदातिरी मी सदा मस्त ‘नर्मदा परिक्रमा करण्याचा महत्वाचा नियम म्हणजे कुठेही नर्मदा मैय्याला ओलांडण्याचे नाही’, ‘परिक्रमा करताना आपल्याला कधी राजयोग, तर कधी भिकारी योग, कधी जेवायला पंचपक्वान्न, तर कधी नुसतीच बिस्किटे’, ‘दगड- धोंड्यातून वाटचाल करत पुढे आलो, तर एका शेतात एक आदिवासी शेताला पाणी देत होता.’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language